रामनगर येथे दुर्गामाता दौंडला प्रारंभ.

रामनगर येथे दुर्गा माता दौडला घटस्थापनेपासून सुरुवात झाली आहे. तर सदर दुर्गामाता दौडला युवक तसेच युवती याचबरोबर चिमुकल्यानी ही मोठा सहभाग दर्शवला. तर दुसऱ्या दिवशीच्या दौडलाही मोठ्या संख्येने युवा पिढी उपस्थित होती. दौडच्या स्वागताला दौड येणाऱ्या मार्गावरील प्रत्येक घरातील कुटुंबाने आपल्या घरासमोर असणाऱ्या रस्त्यावर रात्रीपासूनच झाडलोट करून पाणी मारणे, रांगोळी काढणे, पताका – तोरणे लावणे तसेच अनेकांनी भगवे पताक्याची तोरणे पूर्ण रस्ता लावून संपूर्ण वातावरण भगवेमय केले होते. यावेळी चिमुकल्या कडून पोवाडे तसेच शिवाजी महाराजांचा जयघोष घोषणाबाजी करण्यात येत होते.तर दसरोत्सवा पर्यंत गावातील विविध गल्लीतून सदर दौड प्रति वर्षाप्रमाणे धावणार आहे आणि दुर्गेचा जागर करणार आहे.