अनमोड घाटात सोळा चाकी ट्रकला ग्रँड विटारा वाहनांनी धडकून पेट घेऊन वाहन जाळून खाक

अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणाऱ्या दूध सागर मंदिरापासून खालच्या बाजूला काही अंतरावर गोवा येथे पर्यटन करून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या ग्रँड विटारा वाहनाने कर्नाटकातून गोव्यात जाणाऱ्या सोळा चाकी ट्रकला समोर जोराची धडक दिली व त्यानंतर वाहनाने अचानक पेट घेतला. तर काही क्षणातच सदर ग्रँड विटारा जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर घटना सोमवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. तर फोंडा येथून अग्निशामक दलाच्या वाहनाला बोलवण्यात आले पण तोवर सदर ग्रँड विटारा जळून गेली होती. घटनेचा पुढील तपास कुळे पोलीस करत आहेत,