रामनगर बापुजी विद्यालयाचा ओम जुवळी यांनी धारवाड येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत एक गोल्ड तर तीन सिल्वर पदके मिळवली

रामनगर बापूजी ग्रामीण विकास कला तसेच वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी ओम जुवळी यांनी गुरुवार 29 रोजी झालेल्या धारवाड युनिव्हर्सिटी अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये एक गोल्ड मेडल. तसेच 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक. तसेच 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक. व 100 मीटर बॅक स्ट्रोक या स्पर्धेत एकूण तीन सिल्वर मेडल मिळवली आहेत. याचबरोबर दोन दिवसापूर्वी झालेल्या बेंगलोर येथील कर्नाटका प्यारा स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये दोन गोल्ड मेडल तसेच एक सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. त्यामुळे ओम जुवळी याचे बापूजी ग्रामीण विकास समिती कारवार येथील अध्यक्ष वनिता प्रभाकर राणे. तसेच उपाध्यक्ष उल्हास नाईक. खजिनदार मंजुनाथ पवार. तसेच रामनगर बापूजी ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र गांजले. डिग्री कॉलेजचे प्रिन्सिपल अनिल कुमार देवर्षी. स्पोर्ट्स टीचर संजय गावडा यांनी कौतुक केले आहे, तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत,6
