रामनगर – धारवाड मार्गावर कोंबडी वाहतूक करणारी बोलेरो कॅम्पर तसेच ट्रकचा अपघात

रामनगर- धारवाड मार्गावरील आळणावर नजीक असणाऱ्या कोगीलगिरी क्रॉस येथे धारवाड येथून गोवा येथे कोंबडी घेऊन जाणारी बोलेरो पिकअप तसेच गोव्यातून हुबळीच्या दिशेने जाणारा ट्रक यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने कोंबडी वाहतूक करणारा बोलेरो चालक गंभीर जखमी झाला आहे. याच बरोबर गोवा मार्गावर असणाऱ्या मोलम पासून काही अंतरावर बेंगलोर येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या कार ने गोवा येथून वीट खाली करून खानापूरच्या दिशेने येणाऱ्या एलपी ट्रकला जोराची धडक दिल्याने बेंगलोर येथील दोन पर्यटक जागीच ठार झाले. याचबरोबर गोवा येथून कार घेऊन गुंजी येथे जत्रेसाठी येत असलेला गुंजी येथील युवक विनोद संभाजी गुरव वय वर्ष 40 हा येत असता वाटरा जुमतळे येथे वळणावर वाहनावरील ताबा तुटून अपघात होऊन विनोद गुरव हा जागी ठार झाला. तर त्या ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री सांगली इथून कारवारच्या दिशेने जाणारी क्रीटा कार येथील वळणावर नियंत्रण तुटून अपघात झाल्याने कारचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात या भागात झालेल्या अपघातात तीन ठार तर पाच हुन अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. रामनगर – खानापूर मार्गावरील जुमतळे येथील अपघातीत वळण ठरले आहे. तर सतत या ठिकाणी अपघात होत असून गेली दोन वर्षात पाच हुन अधिक जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी ” अपघाती वळण ” म्हणून दर्शविणारा फलक लावणे गरजेचे बनले आहे.
