बेंगळुर येथील बारा वर्षीय मुलगा केसररॉक येथील जंगलात फिरत असल्याचे पाहून त्याला केले बालकल्याण विभागाच्या स्वाधीन.

बेंगळूर येथील बारा वर्षीय मुलगा रेल्वेद्वारे केसररॉक येथे येऊन तेथून नजीकच असणाऱ्या कुणगिणी येथील जंगलात फिरत असल्याचे कुणगीणी मठाचे रघुवीर स्वामीजी यांना कळून आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ याची बाब कारवार जिल्हाधिकारी तसेच रामनगर पोलिसांना कळवून त्या बारा वर्षीय मुलाला आपल्या वाहनातून जोयडा येथे नेऊन जोयडा पोलिसांच्या मार्फत बालकल्याण विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. तर सध्या सदर मुलाला येथील बीसीएम हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर जोयडा पोलीस त्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत,
