रामनगर के पी सी कॉलनी येथील घराचे कुलूप फोडून घरातील पैसे तसेच दुचाकी घेऊन चोरटा झाला पसार.

जोयडा तालुक्यातील रामनगर येथील के. पी.सी. कॉलनी मधील राहणारे विलास केशव देसाई यांच्या घरात मंगळवारी रात्री दहा ते बाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दरवाजाला लावलेले कुलूप फोडून आत प्रवेश करत घरातील तिजोरी फोडून त्यामधील जवळपास 70 हजार रुपयाची रक्कम व देवाकडील चांदीचा मुखवटा तसेच मुखवट्याला घातलेले सोने तसेच जाताना घरासमोर असलेली गॅम्बलर बाईक घेऊन प्रसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजता निर्देशनास आली . तर विलास देसाई व त्याचे कुटुंब केपीसी कॉलनीतच असणाऱ्या सरस्वती उत्सवाला गेले होते. व पुन्हा रात्री परतल्यावर सदर घटना त्यांना निर्देशनासाठी आली. याबाबत रामनगर पोलिसांना ताबडतोब कळल्याने पोलिसांनी येऊन रात्री पाहणी केली. सदर या घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात करण्यात येणार आहे. तर सध्या जोयडा तालुक्यात सध्या चोरट्यांचा जणू सीजनच चालू आहे. तर यापूर्वी रामनगर येथील दोन देवस्थाने त्यानंतर तिनेघाट येथील दोन देवस्थान त्यानंतर आक्राळी येथील देवस्थान व आता बंद घराचे कुलूप तोडून चोरी होऊ लागल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.