अनमोड अबकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत असल्या प्रकरणी बेळगाव येथील युट्युबवरच्या विरोधात रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल.

अनमोड येथील अबकारी कार्यालयात जाऊन कर्मचारी तसेच अबकारी अधिकाऱ्यांना धमकावून दहा लाखाची रक्कम मागितल्या प्रकरणी अनमोड अबकारी अधिकारी महेंद्रकुमार नाईक. यांनी रामनगर पोलीस स्थानकात मारुती केळगिरी. राहणार ज्योतीनगर. कंग्राळी बेळगाव. याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर बेळगाव तसेच बेळगाव तालुक्यातील काही युट्युबर अनमोड अबकारी चेक नाका तसेच आरटीओ चेक नाका. फॉरेस्ट नाका. तसेच आदि सरकारी कार्यालयात जाऊन आपण पत्रकार असून तुमच्या विरोधात छापणार असल्याचे सांगून ब्लॅकमेल करत असल्याची घटना वरचेवर होत आहे. परंतु अजूनही कोणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस केले नव्हते. परंतु अनमोड अबकारी अधिकाऱ्यांनी अशाच धमकावत असलेल्या एका यूट्यूब चैनल च्या संपादकावर प्रथमताच तक्रार दाखल केली आहे. तर असेच धाडस इतर सरकारी अधिकाऱ्यांनी या भागात येऊन युट्युबर म्हणून सांगून धमकावणाऱ्या बोगस पत्रकारांवर केलास यापुढे असे गैरप्रकार होणे बंद होतील. या प्रकरणी रामनगर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
