जोयडा तालुक्यातील ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाट लावण्याचे देण्यात आले ट्रेनिंग.

जोयडा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींना त्या त्या ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या मशनरी सरकारतर्फे देण्यात आले आहेत. 

( रामनगर ग्रामपंचायत येथे कचऱ्याचे विल्हेवाट देण्याचे प्रशिक्षण देतेवेळी )

तर देण्यात आलेल्या अत्याधुनिक मशनरी चा वापर कशाप्रकारे करावा व सदर मशनरी चा उपयोग करतेवेळी कोण कोणत्या खबरदारी घ्यावा याबद्दल जोयडा कार्यनिर्वाहक अधिकारी भारती एन यांच्या अध्यक्षतेखाली जोयडा तालुक्यातील 16 ग्रामपंचायत मधील अभिवृद्धी अधिकारी. तसेच सफाई कर्मचारी. या सर्वांना रामनगर ग्रामपंचायत येथे कारवार येथील एच. आर. डी. विभागाचे अधिकारी सूर्य नारायण भट. यांच्याकडून सदर कचरा विल्हेवाट बद्दल सविस्तर माहिती तसेच प्रशिक्षण देण्यात आले. तर सदर अत्याधुनिक मशीनमध्ये प्लास्टिक बॉटल तसेच इतर सुका कचरा घालून कशाप्रकारे त्याची पावडर बनवता येते याबद्दल सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली,