गोवा राज्यातील टाकाऊ कचरा कर्नाटकात.मनस्ताप मात्र कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकच्या मागून जाणाऱ्यांना.

गोवा राज्यातील सर्व प्रकारचा टाकाऊ कचरा बऱ्याच वर्षापासून कर्नाटकातील बागलकोट या ठिकाणी सिमेंट फॅक्टरीला ट्रक मधून अनमोड घाटातून खानापूर मार्गे सतत जात असतो. तर सदर टाकाऊ कचरा वाहतुकी दरम्यान दहा चाकी अथवा बारा चाकी ट्रक मध्ये ट्रकच्या केबिनच्या वर पर्यंत डोंगर रचल्या प्रमाणे सदर टाकाऊ कचरा भरण्यात येतो. तर सदर ट्रकची बांधण्यात आलेले ताडपत्री ही कायम फाटलेल्या स्थितीतच असते. तर वाहतुकी दरम्यान फाटलेल्या ताडपत्रीतून दुर्गंधी येत असल्याने ट्रक मागून जाणाऱ्या वाहनांना तर मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. तर बरेच वेळा सदर फाटलेल्या ताडपत्री मधून टाकाऊ कचरा रस्ता भर पडत असल्याने टाकाऊ कचरा पडलेल्या ठिकाणाहून जाताना मोठ्या दुर्गंधीचा सामना सर्व वाहनधारकांना करावा लागतो. तर या समस्येकडे कोणताच संबंधित अधिकारी लक्ष देत नाही.

व हे सर्व पाहून ही संबंधित अधिकारी मुग गिळून गप का बसतात असा प्रश्न आता सर्वांसमोर उभे राहिला आहे. तर गोव्यातील टाकाऊ कचरा घेऊन जायचं असेल तर एखाद्या कंटेनर मधून घेऊन गेल्यास अशा समस्याच नागरिकांना उद्भवत नाही. परंतु पॅक बंद कंटेनर मधून घेऊन जाण्यापेक्षा खुला ट्रक मधून फाटलेली ताडपत्री बांधून घेऊन जाणेच योग्य का समजले जाते असाही सवाल आता पुढे येत आहे,
