रामनगर- धारवाड मार्गावर दुचाकी अपघातात जखमी झालेला लोंढा येथील युवकाचा अखेर मृत्यू.

रामनगर- धारवाड मार्गावरील लिंगनमट नजीक लोंढा येथून आळणावरच्या दिशेने दुचाकीवरून जाणारा गुलाम रसूल इटगी. वय वर्ष 41. हा सोमवारी सकाळी जात असता स्वतः दुचाकीवरून पडून जखमी झाला होता. त्यामुळे गुलाम या युवकाला हुबळी येथील KMC हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. परंतु अखेर बुधवार रोजी त्याचा मृत्यू झाला. घटना कळतात लोंडा गावात शोककळा पसरली. सदर अपघाताची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. त्यामुळे नंदगड पोलीस सदर अपघाताचा पुढील तपास करत आहेत,
