शिवठाण येथे हत्तीच्या कळपांकडून शेतकऱ्यांचे नुकसान

खानापूर तालुक्यातील शिवठाण या गावात हत्तीचा कळप दाखल झाला असून येथील शेतकऱ्यांचे लावण्यात आलेल्या भाताचे नुकसान सदर आलेल्या हत्तीच्या कळपांकडून करण्यात येत आहे.

( शिवठाण गावात भाताचे हत्तीने केलेले नुकसान )
तर गेली दोन दिवसापासून चार हत्तीचा कळप शिवठाण गावात दाखल होऊन येथील असणाऱ्या कृष्णा रामा मिराशी. या शेतकऱ्याचे तीन एकर मध्ये लावण्यात आलेल्या भात पिकाचे फार मोठे नुकसान केले आहे. तर सदर शेतकऱ्यांनी पावसाने ही दडी मारल्याने शेताच्या जवळच असणाऱ्या नाल्यातून इंजिन लावून त्याच्यामार्फत शेतामध्ये पाणी फवारून भाताची लागवड केली होती. पण झालेली लागवड हत्तीच्या काळपाने तुडवून पूर्णता भाताचे नुकसान केले आहे. तर दरवर्षी शिवठण. माचाळी. मांजरपाई. आदी भागात भाताच्या शेतीची लागवड झाल्यावर तसेच तसेच लावण्यात आलेला ऊस तोडला लायक झाल्यानंतर हत्तीचे कळप येथील गावात असणाऱ्या शेतवाडीत येऊन नुकसान करत आहेत. पण अजूनही फॉरेस्ट विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली नाही,
