काळी नदीपात्रात राफ्टिंग करण्याच्या ठिकाणी मगरीचा वावर असल्याचे निर्देशनास येऊ लागल्याने बहुतांश पर्यटकांचा ओघ झाला कमी.

गणेशगुडी येथील काळी नदीपात्रात सुपा धरणाच्या समोरच असणाऱ्या ब्रिज खाली तसेच इतर जलक्रीडा करण्याच्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना मगरीचा वावर निर्देशास आल्याने व याच बरोबर जलक्रीडा करण्याच्या नदीपात्रात मगर फिरत असल्याचा व्हिडिओ ही सर्वत्र व्हायरल झाल्याने सध्या नदीपात्रात जल क्रीडा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. तर पूर्वी शनिवार -रविवार तसेच दासरोत्सवाला पडणाऱ्या सुट्टीत देशभरातून पर्यटक गणेशगुडी येथील काळी नदीपात्रात शॉर्ट ट्रफ्टिंग,बिग ग्राफ्टिंग, कायाकिंग, झोर्बिंग, स्विमिंग. अशा वेगवेगळ्या जलक्रीडा करण्यासाठी पर्यटक येत होते. परंतु आता मगरीचा वावर दिसू लागल्याने बऱ्याच पर्यटकांनी या ठिकाणची पाठ फिरवली आहे. तर वास्तविक टुरिझम तसेच फॉरेस्ट विभागाने पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे ही तितकेच गरजेचे आहे. तर याच बरोबर खबरदारीच्या दृष्टिकोनातून मगरीचा वावर असल्याचा फलक लावल्यास अचानक नदी पात्रात उतरणाऱ्या पर्यटकाला सतर्कतेचा इशारा मिळू शकतो.
